आत्ताच आम्ही मध्यप्रदेशाची सहल करून आलो. जबलपूर – खजुराहो – बान्धवगड – अमरकंटक – कान्हा – जबलपूर असा १३०० कि.मि.चा प्रवास केला. त्या प्रवासाची शब्दचित्रे इंग्रजीमधून http://fromperiphery.wordpress.com/ या माझ्या संकेतस्थळावर प्रकाशित करणे सुरू केले आहे. परंतू काही गोष्टी मायबोलीतच व्यक्त करता येतात. त्यापैकी ही एक.
प्रवासात दर दोन-तीन तासांनी चहापाण्यासाठी आम्ही थांबत असू – बहुतेकवेळी रस्त्याकडेच्या टपरीवरच. बर्याचशा टपर्या म्हणजे पाठी घर व पुढे चहाचे दुकान अशाच असत. चहासुद्धा आँर्डर दिल्यावर मगच टाकला जात असे. अशाच एका ठिकाणी टपरीवाल्याची लहान मुले आजुबाजूला भोवती फिरत होती. नेहमीप्रमाणे चहा तयार होईपर्यंत मी त्या छोटया मुलांचे फोटो काढू लागलो. अशा ठिकाणी पोर्टेट नेहमीच छान मिळतात. एकदोन फोटो पाहिल्यावर ती मुलेही पुढेपुढे करत होती.
ही थॊडी वयात आलेली मुलगी जरा बाजूलाच उभी होती. मी काही तिच्याकडे फार लक्ष दिले नाही. चहा तयार झाल्यावर मी कॅमेरा बॅगेत ठेऊ लागलो तशी माझी बायको म्हणाली “अरे, तिचा एक तरी फोटो काढ. जरा बघ तरी ती कितीवेळ वाट बघत तशीच लाजत उभी आहे”. हा तो फोटो, त्या लाजर्या मुलीचा.
फोटो पाहताक्षणी सर्वांनी एकच शब्द उच्चारला – मुग्धा.
मुग्धा. नाजूक अर्थाचे अतिशय गोड नाव. संस्कृतमध्ये मुग्धा म्हणजे लाजरी, बावरलेली, अननुभवी, कोवळी, नुकतीच वयात आलेली बालिका. अशा या बालिकेचे हे गोड छायाचित्र.
Shrirang,
very nice. you have captured her innocence on the face rightly.
मुग्धा लाजरी गोजिरी तर आहेच पण तिच्या डोळ्यात थोडे अवखळ भाव असे आहेत ते मुग्धाच्या पलिकडले आहेत. ह्या फोटोमध्ये तिचा हा भाव टिपल्याबद्दल आभार. मजा आली. अश्या फोटॊंच्या बाबतीत मी “reading between lines” चा प्रयोग करते आणी मग खूप मजेशीर अनुभव येतो. तुम्हीही करून पहा म्हणजे तिच्या डोळ्यातील अवखळअपणा आहे म्हणजे तिच्या मनात काय काय विचार येत असतिल ?? मजा येइल. मग ते चित्र जास्तच बोलके होते….try it out. माझ्याशी अशा बर्याच मुग्धा बोलतात बर का 🙂 अमुच्या कलेक्शनमध्ये पण एक अशीच मुग्धा आहे.