वो काला एक बांसुरीवाला। सुध बिसरा गया मोरी रे॥ सुध बिसरा गया मोरी……. ॥
माखनचोर वो नंदकिशोर। कर गयो ओ s रे, कर गयो मनकी चोरी रे ।
सुध बिसरा गया मोरी……. ॥
अनुप जलोटा यांनी गायलेले हे प्रसिद्ध भजन. हे ऐकताना तो कृष्ण कसा दिसत असेल असे विचार नेहमी मनात येत असत. मग अनेक चित्रकारांनी रंगवलेला कृष्ण डोळ्यांपुढे येई. पण तो कृष्ण नीळा असे. अनेक मंदिरामधील कृष्णाच्या मुर्ती तर संगमरवरी असतात. मग काळा कृष्ण कसा दिसत असेल ते काही मनापुढे स्पष्टपणे येत नसे.
गेल्या आठवडयात कर्नाटकातील प्रसिद्ध बेल्लुर मंदिरात जाण्याचा योग आला. बेल्लुर येथील प्रमुख मंदिर चन्नकेशवाचे आहे. त्या बाजुलाच एक महाविष्णुचे मंदिर आहे. आत शिरल्यावर मुख्य सभागृहाच्या डाव्या उजव्या अंगाला अनेक छोटया देवदेवतांच्या खोल्या किंवा गाभारे आहेत. त्यातील एका खोलीत हा कृष्ण लपला होता. तो दिसला आणि माझ्या मनाने एकदम तान छेडली – वो काला एक बांसुरीवाला – आणि मग माझी अवस्था काही क्षण – सुध बिसरा गया मोरी रे – अशीच झाली.
ठेंगणी ठुसकी कृष्ण दगडातील कृष्ण-मुर्ती एका काळ्या गोल दगडावर उभी होती. अगदी आपला पंढरपूरचा पांडुरंग जसा विटेवर उभा आहे तशीच. तो विठोबा देखिल कर्नाटकातून नाव बदलून महाराष्ट्रात आलेला कृष्णच आहे म्हणे – ‘कानडाउ विठ्ठलु करनाटकु तेणे मज लावियेला वेधु’. पुंडलिकासाठी विटेवर वाट बघत उभा राहिलेला विठोबा तो. नाव-गाव बदलले तरी सवयी नाही बदलल्या. तसाच विटेवर उभा, भक्तांची वाट बघत. बहुतेक त्या मोठयाचेच हे लहानपणचे रूप असावे. जरीकाठाचे रेशमी धोतर नेसवलेला. डावा पाय सरळ व उजवा थोडा वाकवलेला. ओठावरील बासरीचा नाद अंगांगात भरवून जणू डोलत असलेला. कपाळभर गंध व या सर्वांच्या पलिकडचे त्याचे जादुभरे कमल-नयन. ते तुमच्यावर कधी गारुड करुन जातात काही कळतच नाही. आज आठवडा उलटला तरी ते गारुड काही अजून उतरले नाहीये व उतरावे अशी इच्छाही नाही.
माझ्या मनाची आक्रंदने मात्र म्हणताहेत……
छुप गयो फिर एक तान सुना के, कहां गयो एक बाण चला के ॥
गोकुल ढुन्ढा मैने मथुरा ढुंढी, कोइ नगरीया ना छोडी रे….
…..सुध बिसरा गया मोरी॥
sundar murti…..tumcha bhaav suddha tevdhach sundar.murti cha sadhepana atishay bhavla mala.
Blissful! We so wish to experience the world again in Black and White like this idol..
We are so lost in shades of Grey…
Perfect!! “Kanada ho vitthalu, karnataku; tene maj laviyala vedu”!!!!